आमचे मुंबई दर्शन : आमच्या ताईसोबत मुंबईचे दर्शन घेताना खूप मजा आली. तिने आपले ऑफिस दाखवले. ऑफिस मधील अधिकारी भेटले. त्यांच्याशी गप्पा करंज्या चिवडा झाला. तिच्या मैत्रिणी तर इतक्या प्रेमळ कि त्यांना खूप पूर्वीपासून ओळखतो आहोत अशा प्रकारे त्यांचे वागणे होते. त्या माझ्या कधी जवळच्या बहिणी कि मैत्रिणी झाल्या समजले देखील नाही. माझ्या छोट्या उर्मीला तर त्यांचा लळाच लागला म्हणाना . त्या तिच्याशी इतक्या समरसून खेळत होत्या कि त्यांना जणू त्यांचे बालपण आठवत असावे असा मला क्षणभर भास झाला. खरंच लहान मुलं किती निरागस असतात आमच्या उर्मीसारखी ....त्यांना खरे प्रेम लगेच कळते. त्या अशा निरागस प्रेमाकडे आपसूकच ओढल्या जातात. आणखी दोन नवीन आत्या मिळाल्याचा आनंद माझ्या दोन्ही मुलींच्या मुखावर ओसंडून वाहताना मला दिसत होता. त्या दोघी तर त्यांच्यात इतक्या रमल्या ते क्षण त्यांना पुन्हा हवेसे वाटत असावेत. November 30, 2019 Read more